बँकींग फ्रंटीअर्स व नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकीग समितीतर्फे दरवर्षी देशातील बँकींग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन २०२४-२५ या आर्थीक वर्षात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिजीटल प्रणालीव्दारे केलेल्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल ‘बेस्ट पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा येथे नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकीग समितीतर्फे आयोजित पुरस्कार कार्यक्रमात गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते व गुजरात अर्बन को-जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष ज्योनींद्र मेहता यांच्या उपस्थितीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व बँकेचे आय टी विभागाचे उपसरव्यवस्थापक हर्षवर्धन भड़के यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या कार्यक्रमाप्रसंगी गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, देशातील राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे देशातील आर्थीक उन्नतीत महत्वाचे योगदान असुन सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना अत्याधुनीक बँकींग सुविधेचा लाभ होत आहे असे प्रतीपादन केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हयातील दुर्गम व अतीदुर्गम भागातील शाखामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मार्फतीने ग्राहकांना ए. टी. एम, मोबाईल बँकींग, युपीआय, क्युआर कोड, आय एम पी. एस. ई. अत्याधुनीक डिजीटल बँकींग सुविधा उपलब्ध करुन दिली आहे . बँकेने ग्राहकांकरीता सर्वोत्तम पेमेंट परिवर्तन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदर पुरस्काराने सन्मानीत केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सुपर्ण संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी जिल्हयातील बँकेचे सर्व खातेदार, ग्राहक, शेतकरी वर्ग, सर्व सहकारी सस्थांचे पदाधिकारी व सभासद, महिला बचत गटाचे सदस्य तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.