देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतुन सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांना बँको तर्फे सन २०२३–२४ या वर्षाचा ‘ बँको ब्ल्यु रिबन २०२४‘ प्रथम पुरस्कार दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच लोणावळा येथे विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक बागेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी पुरस्कार स्विकारला.
दि. २८ जानेवारी २०२४ ला लोणावळा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते. देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांमधुन रिझर्व बँकेच्या आर्थीक निकषानुसार उत्कृष्टपणे काम करणाऱ्या व आर्थीक दृष्ट्या सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दरवर्षी बँको पुरस्कार दिल्या जातो. सन २०२३–२४ या आर्थीक वर्षात ठेववृध्दीमध्ये ज्या जिल्हा बँकांच्या ठेवी २,५०० ते ३,००० कोटीच्या ठेवी आहेत, त्या जिल्हा बँकांच्या श्रेणीमधुन तसेच रिजर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार एन.पी.ए. चे प्रमाण, सी. आर. ए. आर. आदी निकषात बँक पात्र झालेली असुन दि. ३१ मार्च २०२४ च्या आर्थीक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एन.पी.ए. १.३० टक्के आहे. बँकेने आर्थीक निकषात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरच्या सन २०२४ या वर्षाचा बँको ब्ल्यु रिबन पुरस्काराने बँकेला सनन्मानीत केलेले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, पदाधिकारी व संचालक यांनी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे बँकेला हे यश प्राप्त करता आले असे बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार यांनी सांगितले.